शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बॉसच्या त्रासाला कंटाळून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 20:39 IST

कोरेगाव येथील प्रकार : अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पुसेगाव : कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

पंकज शिवाजी गायकवाड (वय २७, रा. शिंदेवाडी, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस आणि मयत युवकाचे वडील शिवाजी श्रीरंग गायकवाड (रा. शिंदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंकज हा वडूज येथील आयसीआयसीआय या बँकेत दोन वर्षे कॉन्ट्रक्ट बेसेसवर काम करत होता. त्यानंतर त्याने या बँकेची परीक्षा देऊन त्याच बँकेत रिलेशनशीप ऑफिसर म्हणून पद मिळविले. एक वर्षे पुणे येथील बँकेच्या शाखेत काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पंकज कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करू लागला. शिंदेवाडीतून तो कामावर ये जा करत होता. 

दरम्यान, वर्षेभरापासून बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील हे पंकजच्या मोबाईलवर सातत्याने कामावरून काढून टाकेन, अशी विनाकारण धमकी देत होते. ‘तुझे काम बरोबर नाही, तुला कामावरून काढून टाकणार आहे, तू त्याच लायकीचा आहे, तुझा प्रवासभत्ता बील मंजूर करणार नाही, काय करायचे ते कर,’ अशी वारंवार धमकी देत होते. याबाबत पंकज याच्या मोबाईलवर या दोघांतील संभाषण रेकॉर्डींग झालेले आहे. त्याने दिवसभर इतरत्र फिरून आणलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते. ‘तुझ्यामुळे बँकेचा परफार्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो नाही तर तुझी बदलीच करतो,’ अशी धमकी त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्याकडून दिली जात होती. घरची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल, त्यामुळे पंकज गेल्या चारपाच दिवसांपासून मानसिक धडपणाखाली व प्रचंड दबावाखाली होता. या त्रासाला कंटाळून त्याने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, वडील शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर शाखाधिकारी महेश पाटीलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. 

टॅग्स :bankबँकSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस