पुणे : एका ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करुन तिच्या खात्यातील तब्बल १ कोटी ८८ लाख रुपये स्वत:च्या खात्यात वळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निरज प्रभाकर टिळक (वय ४५, रा. अमरपार्क, केळकर रस्ता, नारायणपेठ) याला पोलिसांनी अटक केली. मुंढव्यातील एका ५९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार आरोपी टिळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणून काम करतो. तेथे फिर्यादी महिलेचे बँक खाते आहे. टिळक याने फिर्यादींचा विश्वास संपादन करुन व्यवसायासाठी मदत करतो असे सांगितले. फिर्यादीच्या सहा धनादेशावर स्वाक्षऱ्या घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे स्वत:च्या खात्यात वळते केले. तसेच फिर्यादींच्या बँक खात्याला स्वत:चा ई-मेल अयडी जोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना जानेवारी २०१७ नंतर वेळोवेळी घडली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गजानन पवार पुढील तपास करत आहेत.
बँक कर्मचाऱ्याने स्वत:च्या खात्यात वळविले पावणे दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:11 IST
एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणून काम करणाऱ्याने सहा धनादेशावर स्वाक्षऱ्या घेऊन ज्येष्ठ महिलेच्या खात्यातील पैसे स्वत:च्या खात्यात वळते केले.
बँक कर्मचाऱ्याने स्वत:च्या खात्यात वळविले पावणे दोन कोटी
ठळक मुद्देफिर्यादींच्या बँक खात्याला स्वत:चा ई-मेल अयडी जोडल्याचे तक्रारीत नमूद