शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अवसायानातील बँकांची मालमत्ता विक्री होणार सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:24 IST

आर्थिक अनियमिततेमुळे राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अवसायनात (लिक्विडेशन) गेल्या आहेत. त्यांचा कारभार सरकारनियुक्त अवसायकामार्फत चालू आहे.

ठळक मुद्देसहकार विभागाने स्थापला संनियंत्रण कक्ष मालमत्ता विक्रीचा घेतला जाणार आढावा सहकार विभागाला बँकांच्या मालमत्ता विक्री बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना

पुणे : अवसायनाला दहा वर्षे पूर्ण झालेल्या बँकांच्या मालमत्ता विक्रीची कार्यवाही आता जलद गतीने होणार आहे. सहकार विभागाने त्यासाठी अवसायक कामकाज संनियंत्रण कक्ष स्थापन केला असून, त्यामार्फत मालमत्ता विक्रीचा आढावा सहकार आयुक्तालयाकडून घेतला जाणार आहे. बँकेच्या मालमत्ता विक्री करुन ठेवीदारांच्या रकमा परत मिळण्याच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत.  आर्थिक अनियमिततेमुळे राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अवसायनात (लिक्विडेशन) गेल्या आहेत. त्यांचा कारभार सरकारनियुक्त अवसायकामार्फत चालू आहे. वर्षानुवर्षे या बँकांमध्ये सामान्य नागरिकांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. या बाबत उच्च न्यायालयाने या बँकांच्या मालमत्ता विक्री बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना सहकार विभागाला दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अवसायनातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर अवसायन कामकाज संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत बँकांच्या मालमत्ता विक्रीची कार्यवाही आणि त्याची सद्य:स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. उच्च न्यायालयाने येत्या २३ आॅगस्ट रोजी त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. अवसायनातील नागरी सहकारी बँकांच्या स्वमालकीच्या अथवा भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तांच्या विक्रीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यात मालमत्ता विक्रीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यापासूनस मालमत्तेची वाजवी किंमत, लिलाव प्रक्रिया ते खरेदीखत पूर्ण करण्याच्या कार्यवाहीचा समावेश आहे. बँकेचा गाळा, सदनिका, इमारत, मोकळी जागा, जागेचे क्षेत्रफळ, इमारत अथवा इमरातीमधील मजला अशी सर्व माहिती सादर करण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी नागरी सहकारी बँकांच्या सनियंत्रण समितीला दिला आहे. या शिवाय एखाद्या मालमत्तेसंदर्भात न्यायालयात दावा सुरु असल्यास अथवा त्यावर काही निर्णय झाला असल्यास त्याची माहिती देखील कळविण्यात यावी असेही समितीला सांगण्यात आले आहे. आज आढाव्यासाठी बैठक मालमत्ता विक्रीच्या कार्यवाहीचा कृती कार्यक्रम, मालमत्ता विक्रीत येणाºया अडचणी या बाबत सहकार आयुक्त कार्यालयाला माहिती देण्याची सूचनाही सहकार आयुक्तांनी या पुर्वी केली आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. २१ आॅगस्ट) सहकार आयुक्तांनी बैठक बोलावली आहे.  

टॅग्स :PuneपुणेbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र