शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

बंडातात्या कराडकरांची जीभ घसरली! म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींचा अहिंसा मार्ग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 4:01 PM

स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली

राजगुरुनगर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथे २३ मार्च या शहिददिनी आळंदी ते राजगुरुनगर येथे राज्य व्यसनमुक्त युवक संघाची भक्तीपीठ ते क्रांतीपीठ पदयात्रा घेऊन बंडातात्या कराडकर येथे आले होते. यावेळी भाषणात कराडकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे.

''स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. भारताला १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे अहींसेद्वारे मिळाले नसून सशस्त्र क्रांतिकारकांच्या कष्टातून मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.''  कराडकर म्हणाले,  हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव हे देशाच्या तीन वेगळ्या प्रांतातील तरुण एका समान धाग्याने एकत्र आले. तो म्हणजे स्वातंत्र्य. परंतु हे स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली. तो वणवा देशभर पेटला. आणी म्हणून ब्रिटीशांना येथून काढता पाय घ्यावा लागला.

साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीने मिळाले स्वातंत्र्य 

भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या अहिंसेच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947 साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942 ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया त्यामधून पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की 'साबरमती के संत तुने कर किया कमाल, असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असं कराडकर म्हणाले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKhedखेडBhagat SinghभगतसिंगIndiaभारत