शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

अष्टविनायक मोरगावच्या यात्रेत यंदा जलाभिषेक आणि पूजेला बंदी, दर्शन मात्र सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 10:17 IST

Ganesh Jayanti News :  यात्रेदरम्यान  सर्व धर्मीयांना  मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने  मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस जलस्नान घालण्याची परवानगी  असते . मात्र  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे  ही परवानगी प्रशासनाने  नाकारली आहे . 

बारामती - अष्टविनायक तीर्थक्षेत्र  मोरगाव ता. बारामती येथील माघी  यात्रा उत्सवाच्या निमित्ताने माघ शुद्ध प्रतिपदा शुक्रवार  दि . १२ ते  माघ शुद्ध पंचमी  मंगळवार  दि .१६  पर्यंत विविध  धार्मिक कार्यक्रम होणार  आहेत .  यात्रेदरम्यान  सर्व धर्मीयांना  मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने  मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस जलस्नान घालण्याची परवानगी  असते . मात्र  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे  ही परवानगी प्रशासनाने  नाकारली आहे .  उत्सवकाळात मंदिर सुरु राहणार असून   भाविकांना केवळ नित्य दर्शन  घेता येणार असल्याची  माहीती  चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .

दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात  पहाटे पाच ते  दुपारी बारा वाजेपर्यंत  मुख्य मूर्ती गाभार्‍यापर्यंत जाऊन श्रींना जलस्नान व अभिषेक पूजा घालण्याची  पर्वणी साधता येते . वर्षातुन हा दोनदा योग असतो . त्यापैकी एक भाद्रपद यात्रा व दुसरी माघ यात्रा उत्सव होय.  काही दिवसावर येऊन ठेपलेल्या माघी यात्रा उत्सवास  परवानगी मिळणेबाबत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने पत्रव्यवहार केला होता . त्याचबरोबर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी  भावीकांना   मुक्तद्वार दर्शनास परवानगी मिळणेबाबत प्रांताधीकारी व विविध शासकीय पातळीवर प्रयत्न केले होते .  यानुसार  वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आज दि १०  रोजी  दिलेल्या पत्रानुसार  कोरोना  या विषाणूजन्य आजारामुळे फक्त मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन जलस्नानास (  मुक्तद्वार दर्शनास )  परवानगी नाकारली आहे . मात्र  नेहमीप्रमाणे  मंदिर सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे  . सर्व भावीकांसाठी  मुख्य मुर्ती गाभाऱ्याच्या बाहेरुन   नित्य दर्शनास  , तसेच परंपरेने चालत आलेल्या   धार्मिक कार्यक्रमास  परवानगी दिलेली आहे. दरम्यान श्रीमान महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा मागील  भाद्रपद यात्रेप्रमाणे याही यात्रेस  गाडीतून येणार आहे . हा पालखी सोहळा रविवार दि . १४ रोजी  रात्री ८ वाजता येणार आहे . यावेळी मंगलमूर्ती व मयुरेश्वर भेट सोहळा संपन्न  होतो  . यात्रे दरम्यान श्रींना  सुवर्णालंकारयुक्त पोशाख चढविण्यात येतो .यात्रा काळात  मुख्य विश्वस्त  मंदार देव यांच्या हस्ते महापूजा व ईतर धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तर मंगलमूर्ती पालखीचे मोरगाव येथून  प्रस्थान बुधवार  दि  १७ रोजी  दुपारनंतर होणार आहे .

टॅग्स :PuneपुणेAshtavinayakअष्टविनायक गणपती