शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Pune Corona News: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 'या' पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 19:03 IST

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुण्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर आणि हवेली तालुक्यातील ऐतिहासिक वास्तु, गड - किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटनाला बंदी घातली आहे. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अहवाल व मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोवीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला असून, या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील सर्व मनोरंजन उद्याने, प्राणीसंग्रहालय, वस्तु संग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे  कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तु, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी नागरिक पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात.

सदर ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरीकांची  पर्यटकांची गर्दी होते. या पर्यटनाचे ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल मोठया प्रमाणात लावण्यात आलेले असतात. सदर खाद्य पदार्थ विक्री स्टॉलवार पर्यटक विना मास्क, सामाजिक अंतर पालन करता गर्दी करतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन इत्यादी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होणार नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रसार ओमिक्रॉन व्हेरियंटसह मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्या प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश करण्याची विनंती केली आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी या सात तालुक्यात पर्यटन बंदीचे आदेश काढले. 

या सात तालुक्यात 'या' ठिकाणी पर्यटनास बंदी

मावळ :  भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, बेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर.

मुळशी : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर, सहारा सिटी. 

हवेली :  घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर.

आंबेगाव :  डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.

जुन्नर  :  शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिवटा निवारा केंद्र.

भोर : रोहडेश्वर / विचित्र गड़, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड

वेल्हा :  तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.

टॅग्स :tourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारी