शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटयार्डात सर्वसामान्य ग्राहकांना बंदी ; घराजवळ उपलब्ध हाेणार भाजीपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:59 IST

मार्केटयार्डात आता सामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ किरकाेळ विक्रेत्यांना आत साेडण्यात येणार आहे.

पुणे : पुण्यातील नागरिकांना अत्यावश्यक भाजीपाल व फळे मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये शहरामध्ये प्रभागनिहा नियोजन करण्यात येणार असून, गुलटेकडी मार्केटयार्डात केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे पुढील आदेशापर्यंत सर्वसामान्यांना नागरिकांना मार्केट यार्डातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना आपल्या भागातच भाजीपाल उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावच्या धास्तीने मार्केट यार्डातील आडत्यांनी बाजार बंदचा निर्णय घेतला. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देशात लाॅगडाऊन करत असल्याचे जाहिर केले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड पॅनिक परिस्थिती निर्माण झाली व लोकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर भाजीपाल व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. आडत्यांचा बंद व नागरिकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.25) रोजी बाजार समिती प्रशासन, पुरवठा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन भाजीपाल, फळे वितरणाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये शेतक-यांना मार्केट यार्डात माल घेऊन येण्यास व तेथून पुण्यातील सर्व लहान मोठ्या किरकोळ विक्रेत्यांना त्या शेतमालाचे वितरण करण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशानाला देण्यात आली आहे. बाजार आवारामध्ये शेतकरी आणि किरकोळ विक्रेत्यांची देखील गर्दी होणार नाही , यासाठी टप्याटप्यांनी बाजार आवारामध्ये सोडण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे आता नागरिकांना आपल्या घरा जवळच्या विक्रेत्यांकडे भाजीपाल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वरूपात पॅनिक न होता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड