शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात वाढदिवस साजरा करण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 16:00 IST

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड आवारात चार दिवसांपूर्वी एका आडत्याचा वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. परिणामी एका गाळ्यावरी कांद्याच्या गोण्यांना फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागली होती.

ठळक मुद्देसंबंधित अडत्याकडून बाजार समितीने १ हजार १०० रुपये दंड वसूल  निर्णयाचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई

पुणे: गुलटेकडी येथील मार्केट यार्डात वाढदिवसानिमित्ताने फटाके फोडल्यामुळे कांद्याच्या गोण्यांना आग लागल्याची घटना घडली होती. बाजार समितीने त्याची दखल घेत बाजार आवारात वाढदिवस साजरा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे  बाजार आवारात फ्लेक्सबाजी किंवा फटाक्यांची आतषबाजी करता येणार नाही.तसेच या निर्णयाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड आवारात चार दिवसांपूर्वी एका आडत्याचा वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. परिणामी एका गाळ्यावरी कांद्याच्या गोण्यांना फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागली होती. आगीची तीव्रता कमी असल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण आणता आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्याचप्रमाणे  बाजार आवारात अनेक ठिकाणी वाढदिवसाचे फ्लेक्स लावून बाजाराचे विद्रुपीकरण केले जाते. परंतु, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता बाजार समितीने मार्केट यार्ड आवारात वाढदिवस साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या रविवारी वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करणा-या संबंधित आडत्याकडून बाजार समितीने १ हजार १०० रुपये दंड वसूल  करून समज दिली आहे. बाजार समितीचे सचिव बी.जे.देशमुख म्हणाले, मार्केट यार्डातील जागा ही शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आहे.त्यामुळे ज्यांना आपले वाढदिवस साजरे करायचे असतील त्यांनी बाजाराबाहेर करावेत. बाजारात वाढदिवस साजरा करण्यास तसेच फ्लेक्सबाजी आणि फटाके फोडण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे निर्णयाचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई केली जाईल,असे परिपत्रक अडत्यांना दिले जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डfireआग