गोवंश हत्येविरोधात बजरंग दलाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST2021-07-07T04:11:59+5:302021-07-07T04:11:59+5:30

या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत पालक अशोक येलमार, विहिंप मुळशी प्रखंड अध्यक्ष आचार्य मंदारस्वामी यनपुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक ...

Bajrang Dal's agitation against cow slaughter | गोवंश हत्येविरोधात बजरंग दलाचे आंदोलन

गोवंश हत्येविरोधात बजरंग दलाचे आंदोलन

या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत पालक अशोक येलमार, विहिंप मुळशी प्रखंड अध्यक्ष आचार्य मंदारस्वामी यनपुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळशी तालुका संघचालक कैलासआप्पा चोंधे, हभप. नवनाथ महाराज माझिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषद बजरंग दल मुळशी प्रखंडतर्फे भोसरीला देशी गोवंशाच्या हत्येसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला. पौड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, सुपे व नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देऊन कायद्याची योग्य ती अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी विश्व हिंदू परिषद मुळशी प्रखंडचे प्रखंडमंत्री रोहन निकटे, सहमंत्री विक्रांत निकटे, बजरंग दल संयोजक निखिल मारणे, सहसंयोजक विजय मरगळे, गोरक्षा प्रमुख संकेत कुडले, सहप्रमुख शंतनु निंबाळकर, पिरंगुट सहसंयोजक पंकज गायकवाड तसेच बजरंगी कृष्णा चौधरी, संतोष शेडगे, आर्यन निकटे, रणजित धनवे, शुभम अमराळे, गणेश बलकवडे, समीर मारणे, ध्रुव मेहता व विवेक शेलार उपस्थित होते.

घोटावडे फाटा येथे निषेध आंदोलन करताना बजरंग दलाचे कार्यकर्ते.

Web Title: Bajrang Dal's agitation against cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.