जिवे ठार मारण्याच्या प्रकरणातील एकाला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST2021-03-04T04:20:07+5:302021-03-04T04:20:07+5:30
पुणे : मित्राचा कुणाबरोबर तरी सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न ...

जिवे ठार मारण्याच्या प्रकरणातील एकाला जामीन
पुणे : मित्राचा कुणाबरोबर तरी सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश प्रदीप अष्टूरकर यांनी पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर हा निकाल दिला आहे.
ही घटना २१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास कोथरूड येथील गोसावीवस्ती येथे घडली. या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल आहे. रफिक अमिन संकपाळ (वय २२, रा. गोसावी वस्ती, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मित्र शंकर विटकर आणि ओंकार थिटे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रंगाप्पा अजंनय्या गुत्तेदार (वय २५, रा. पौड रस्ता, कोथरूड) असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. त्याने अँड. राहुल नायर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या नावाचा उल्लेख एफआयआरमध्ये नाही. मुख्य आरोपीसोबत दोन व तीन जण असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्याच्याकडून लोखंडी विळा जप्त केला आहे. मात्र, फिर्यादीच्या नाक आणि कानाजवळ किरकोळ जखमा असल्याचे वैद्यकीय पुराव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे त्याने डावा कान आणि मानेवर वार केले म्हणता येणार नाही. तसे असते जर जखमा अधिक तीव्र असल्या असत्या. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी अॅड. राहुल नायर यांनी केली. ही घटना २१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास कोथरूड येथील गोसावी वस्ती येथे घडली. या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल आहे. रफिक अमिन संकपाळ (वय २२, रा. गोसावी वस्ती, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मित्र शंकर विटकर आणि ओंकार थिटे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.