शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात स्पाय कॅमेरा लावणा-या डॉक्टरचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 16:10 IST

आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा सरकारी वकिलांचा युक्तीवाद

ठळक मुद्देजगतापला जर जामिनावर सोडले तर तो तपासात अडथळा आणण्याचा करेल प्रयत्न

पुणे: भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह आणि शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणा-या सुजित आबाजीराव जगताप या डॉक्टरला ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

डॉक्टरविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगतापला जर जामिनावर सोडले तर तो तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याने तो तक्रारदाराला धमकावण्याची शक्यता आहे. त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा देखील घेऊ शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, आरोपीच्या वकिलांनी सांगितले की ज्या कलमान्वये आरोपींवर दोषा - रोप आहे तो गुन्हा जामीनपात्र आहे.

गूणदोषानुसार खटल्याच्या निकालात बराच कालावधी लागणे शक्य आहे. त्याला जामिनीवर न सोडल्यास त्याच्या रोजगार धंद्याचे नुकसान होईल. तो पुण्याचा कायमस्वरूपी रहिवासी असून, तो फरार होणार नाही. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर जगतापला न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याच्या  बाजूने अँड सुधीर शाह, अँड सारथी पानसरे, अँड तेजलक्ष्मी धोपावकर आणि अँड सूरज इंगले यांनी काम पाहिले.

काय आहे प्रकरण?

सुजित आबाजीराव जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये तो लेक्चरर आहे. त्यातून त्याची महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांशी चांगली ओळख झाली. त्याने त्यांच्याशी बोलताना नकळतपणे त्यांच्या खोलीच्या चावीचे ठसे घेतले. त्याने त्यांच्या खोलीची बनावट चावी तयार करून घेतली. महिला डॉक्टर हॉस्पीटल असल्याचे पाहून त्याने बनावट चावीद्वारे खोली उघडून त्यांच्या स्नानगृह व शयनकक्षात कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. महिला डॉक्टरांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDhankawadiधनकवडी