शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘बाकीबाब’ची अप्रकाशित ‘लावण्यरेखा’ पुस्तकरूपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 12:05 IST

‘आनंदयात्री कवी’ अशी ओळख असलेल्या बोरकरांच्या अनेक नाजूक, नादमय, छंदोबध्द प्रेमरचनांसह निसर्ग कवितांची पारायणे अनेकांनी केली असतील...

ठळक मुद्दे७० ते ७२ कविता आणि अनुवादित केलेल्या कविता यांचे ‘लावण्यरेखा’ हे पुस्तक

नम्रता फडणीस- पुणे :  

‘ओघळती रंग जळी; मावळती वेळातरल हवेवर झुलतो मंद गंध शेला’ किंवा‘गाईन मी स्मर सुखे तव चांदण्यात दे साथ तू मज सुखे स्वर साधण्यात’‘बाकीबाब’ म्हणजे बा.भ. बोरकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून कागदावर उतरलेली ही अप्रतिम शब्दप्रतिभा. ‘आनंदयात्री कवी’ अशी ओळख असलेल्या बोरकरांच्या अनेक नाजूक, नादमय, छंदोबध्द प्रेमरचनांसह निसर्ग कवितांची पारायणे अनेकांनी केली असतील. मात्र, त्यांच्यावरील उल्लेख केलेल्या अनेक अप्रकाशित कवितांविषयी कायमच रसिक मनाला रुखरुख लागून राहिली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी बोरकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत बोरकर यांची कन्या मुक्ता आगशीकर यांनी त्यांच्या अप्रकाशित कवितांचा अमूल्य ठेवा पुस्तकरूपात वाचकांना भेट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या ‘लावण्यरेखा’ या अप्रकाशित काव्य संग्रहाचे प्रकाशन गोव्यामध्ये केले जाणार आहे.‘तव नयनांचे दल हलले गं, पानावरच्या दवबिंदुपरी त्रिभुवन हे डळमळले ग’ यासारख्या बोरकरांच्या असंख्य प्रेमकवितांच्या हिंदोळ्यांवर अनेकांची प्रेमं फुलली आहेत. प्रत्येक कवितेमधलाकुठला तरी एक शब्द संगीतकाराचं  बोट धरुन त्याला आपल्या कवितेच्या महालात घेऊन गेला आहे. निसर्गाच्या कुपीत दडलेले सौंदर्यदेखील बोरकरांनी आपल्या काव्यप्रतिभेतून उलगडले आहे. बोरकरांच्या कवितांचा एक खास कप्पा काव्य प्रेमींच्या मनात दडलेला आहे. बोरकरांच्या काव्यरचनांचे गारुड रसिकमनावर आजही कायम आहे, हेच त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.आताबोरकरांच्या अप्रकाशित काव्य प्रतिभेचा अविष्कार पुस्तकरूपात येत आहे. ही काव्यप्रेमींसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरणार आहे...........इतक्या वर्षांत वडिलांनी अनेक कविता लिहिल्या; पण सगळ्या प्रकाशित झालेल्या नाहीत. त्यातील काही त्यांनी स्वसंग्रही ठेवल्या होत्या. आजमितीला बा. भ. बोरकर यांच्या काव्यांचे १ आणि २ खंड प्रसिद्ध झाले आहेत; पण त्यातही या कवितांचा समावेश करण्यात आलेला नाही. १९३२ ते १९७० दरम्यान विविध दिवाळी अंक आणि मासिकांधून छापून आलेल्या अशा ७० ते ७२ कविता आणि अनुवादित केलेल्या कविता यांचे ‘लावण्यरेखा’ हे पुस्तक आमच्या ईशा प्रकाशनातर्फे गोव्यामध्ये प्रकाशित केले जाणार आहे. प्रसिद्ध समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. यावेळी अनन्वयतर्फे माधवी वैद्य ‘बाकीबाब’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. - मुक्ता आगशीकर 

टॅग्स :Puneपुणे