शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

गरीब रुग्णांना मिळेनात बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 3:18 AM

धर्मादाय रुग्णालयांकडून नकारघंटाच; उपचारांअभावी रुग्णांचा जातोय जीव

- श्रीकिशन काळे पुणे : गरीब रुग्णांना गंभीर आजार झालेला असेल आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत असेल, तर सरकारी किंवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये लगेच बेड मिळण्यासाठी नकारघंटाच ऐकावी लागत आहे. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना उपचार न मिळाल्याने आपला प्राण गमवावा लागत आहे. याबाबत, धर्मादाय आयुक्तांनी या रुग्णालयांवर कडक कारवाई करून, त्यांच्यावर जरब बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.येरवडा येथील बारा वर्षांच्या मुलावर अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका मोठ्या रुग्णालयात उपचारांअभावी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अशा पद्धतीच्या घटना खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये वारंवार घडत आहेत. वस्ती परिसरात गरीब रुग्णांसाठी काम करणाऱ्या स्नेह फाउंडेशनच्या वतीने सरकारी व खासगी रुग्णालयात बेडसाठी विचारणा केली जाते. परंतु, त्यांना कायमच नकारघंटा ऐकावी लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना गंभीर आजार झाला, तरी ते रुग्णालयात जात नाहीत. कारण, त्यांच्याकडे भरायला पैसे नसतात.यासंदर्भात, स्नेह फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा देव म्हणाल्या, ‘‘दररोज आम्ही वस्तीमध्ये जाऊन रुग्णांची तपासणी करतो. गंभीर आजार झाल्यास थेट सरकारी किंवा खासगी रुग्णालयात फोन करून बेड आहे का, याची विचारणा करतो; परंतु प्रत्येक वेळी आम्हाला बेड रिकामा नाही, असेच ऐकावे लागते. यात दोष कोणाचा, हे सांगणे महाकठीण आहे. आज लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, त्या प्रमाणात रुग्णालयांची सेवा कमी पडत आहे. दोन्हींमधील तफावत प्रचंड आहे. सरकारी रुग्णालयात प्रचंड गर्दी असल्याने तिथे अनेक रुग्ण जातच नाहीत. गरीब रुग्ण तर पैसे नसल्यामुळे उपचार घ्यायचे टाळतात. परिणामी, अनेक गंभीर आजारामुळे त्यांचा बळी जात आहे.’’विविध कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा‘‘विविध कंपन्यांच्या सीएसआर शाखेतून आरोग्याशी निगडित अशा रुग्णांसाठी निधी गोळा करायचे म्हटले, तरी प्रत्येक कंपनीचे सीएसआर उद्दिष्ट ठरलेले असते. बहुतांश वेळा उद्दिष्टे सांख्यिक आणि आकडेवारीशी निगडित असतात. उदा. यंदा आमच्या कंपनीचे उद्दिष्टे हे आहे की, आम्ही १० शाळांना प्रत्येकी १ हजार बाक आणि पुस्तके भेट देणार आहोत. त्यामुळे यंदा आरोग्यावरील प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नाही. परिणामी, आम्हा आरोग्यविषयक काम करणाºया संस्थांना हतबल व्हावे लागते. जर कंपन्यांनी आरोग्यावर सीएसआरच्या माध्यमातून मदत देणे सुरू केले, तर काही प्रमाणात तरी वस्तीपातळीवर आरोग्य सुधारू शकते,’’ असे श्रद्धा देव यांनी सांगितले.गरीब रुग्णांना उपचार घेणे हा त्यांचा हक्क आहे; परंतु अनेक धर्मादाय रुग्णालये पैशाच्या मागे लागले आहेत. त्यांना गरिबांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही. गरीब रुग्णांवर धर्मादाय रुग्णालयांनी तातडीने उपचार सुरू केले पाहिजेत. असे न केल्यास त्या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करायला हवा.- उमेश चव्हाण, राज्य अध्यक्ष, रुग्ण हक्क परिषदस्नेह फाउंडेशनच्या समाजसेवकांचा अनुभवसमाजसेवक : हॅलो, एक गरीब रुग्ण आहे, त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करायचे आहे. बेड रिकामा आहे का ?सरकारी रुग्णालय १ : आता बेड रिकामा नाहीय, एक आठवड्याने फोन करा.सरकारी रुग्णालय २ : अहो आम्हाला माहिती आहे की, तुमचा रुग्ण अत्यावस्थेत आहे. पण, आम्ही तरी काय करणार ? आता एवढ्या रात्री डॉक्टर पण कमी आहेत आणि बेड पण रिकामा नाही.खासगी रुग्णालय : आम्ही करतो दाखल तुमच्या रुग्णाला; पण ३० हजार रुपये जमा करावे लागतील.रुग्णाचे आईवडील : मॅडम, अहो आम्हाला नाही करायचं आमच्या बाळाला रुग्णालयात दाखल. आम्ही आमच्या गावाला नेतो. बरं होईल ते. आमची परिस्थिती नाहीये रुग्णालयात दाखल करायची आणि केलं तरी आमची बिगारी पण बुडणार. त्यापेक्षा राहूदे. आम्ही लसणाची माळ बांधतो त्याला आणि गावी घेऊन जातो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPuneपुणे