शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:06 IST

अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्यांचा धोका असतो की, त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लागेल असा ते प्रयत्न करत असतात.

पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले आहे. त्यांनी रास्ता रोको सोबतच रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना चर्चेला येण्याचं आवाहन केलं आहे. लोकांना त्रास होईल असं काही करू नये असं त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.    

फडणवीस म्हणाले, सरकराने पहिल्या दिवशी पासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलावली होती. आपण चर्चा करून ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू असंही त्यांना सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्रीत मला संदेश पाठवला की, लोक जमा होतील त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही. मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवता येतील अशी परिस्थिती आता नाहीये.

त्या गोष्टीवर चर्चा करून त्याचा रोड मॅप तयार करावा लागेल. म्हणून कडू यांना चर्चेचे निमंत्रण देखील आम्ही दिलेले आहे. आता काल आपण बघितलं असेल. तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झाला आहे. रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सची खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. त्यामुळे माझं आवाहन आहे की, त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारे आंदोलन करू नये. लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्यांचा धोका असतो की, त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लागेल असा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे सावध राहण्याची आवशक्यता आहे. कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आंदोलन किंवा बाकी गोष्टी करणं योग्य नाही. त्या करून दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आवाहन आहे कि, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचा पॅकेज दिलंय. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देत आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे. चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा. 

आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊदे 

एक प्रमुख जी मागणी कर्जमाफीची आहे. त्यावर सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. आम्ही त्याची कमिटी पण तयार केली आहे. आज पहिला प्रश्न असा आहे की, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे खराब झालेला आहे. शेती खराब झाली आहे. पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जेव्हा कर्जमाफी करतो. त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात. त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. त्या संदर्भात आम्ही योग्य काही तो निर्णय घेणार आहोत. आज पहिली आवश्यकता काय आहे? त्यावर विचार करायला हवा. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत. असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis urges Bachchu Kadu to discuss farmer issues, avoid protests.

Web Summary : Fadnavis invites Bachchu Kadu for talks on farmer loan waivers, urging him to avoid protests causing public inconvenience. He highlights the government's commitment to supporting farmers and disbursing funds directly to their accounts, emphasizing dialogue over disruptive actions.
टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmers Protestशेतकरी आंदोलनagitationआंदोलनbankबँक