शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Baba Adhav Passes Away : सामाजिक शोषणाचे मूळ शाेधून दुखणे बरे करणारे खरे डाॅक्टर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:11 IST

आयुर्वेदाचा डॉक्टर म्हटलं की दुखणं मुळापासून बरं करतो ही ख्याती असते. डॉक्टर बाबा आढाव हे देखील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. ते पुणे शहराची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाना पेठ मध्ये प्रॅक्टिस करत होते. यामुळे इथे येणाऱ्या व्यावसायिक कामगारांशी तसेच हमालांशी त्यांचा जवळून संबंध आला.

- डॉ. निरज जाधवआयुर्वेदाचा डॉक्टर म्हटलं की दुखणं मुळापासून बरं करतो ही ख्याती असते. डॉक्टर बाबा आढाव हे देखील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. ते पुणे शहराची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाना पेठ मध्ये प्रॅक्टिस करत होते. यामुळे इथे येणाऱ्या व्यावसायिक कामगारांशी तसेच हमालांशी त्यांचा जवळून संबंध आला. यातूनच त्यांना हमालांचे होणारे शोषण लक्षात आले. हमालांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही याची मोठी खंत बाबांना वाटली.डॉक्टर बाबा आढाव यांना या हमालांचे केवळ शारीरिक दुखणे बरे करणे पुरेसे वाटले नाही. त्यांच्या या अवस्थेला जबाबदार असणारे मूळ सामाजिक शोषणाचे दुखणे बरे करणे बाबांनी अधिक महत्त्वाचे समजले.यातूनच त्यांनी १९६६ मध्ये आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. दीर्घकालीन आजाराची चिकित्सा करायची तर केवळ लक्षणांवर उपचार करून चालणार नाही त्यासाठी आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर सातत्यपूर्ण उपचार करणे गरजेचे आहे. हे वैद्यकीय तत्व बाबांनी सामाजिक प्रश्नांना लागू केले आणि त्यासाठी संघटित आंदोलने उभारली.त्यांनी फेरीवाले, कचरावेचक आणि हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हमाल पंचायतची स्थापन केली. हमालांच्या प्रश्नावरती बाबांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे १९६९ ला राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा हा असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील पहिला कायदा मंजूर झाला. हमालांचे शोषण करणारा आजार केवळ बरा करून बाबा थांबले नाही तर आजाराला प्रतिबंध करणारी लसही बाबांनी शोधून काढली.

डॉ. आढाव हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जातीविरोधी मतांचे अनुयायी होते. त्यातूनच त्यांनीही वर्ग, जाती आणि स्त्री-पुरुष विषमतेविरोधात अनेक आंदोलने केली. १९५२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी महागाई आणि अन्नधान्याच्या साठेबाजीविरोधात त्यांनी सत्याग्रह केला. १९६२ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पुनर्वसन धोरणाविरोधात आंदोलन केले. १९७२ मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे, यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाने राज्यभर मोर्चे काढले. पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ ही देखील आढाव यांचीच कल्पना होती. 

इतकेच काय बाबांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी डॉक्टर आहे आणि सामाजिक जीवनात सक्रिय आहे हे लक्षात आल्यावर बाबांनी मला प्रश्न केला की परदेशातून जीवनसत्त्वांच्या गोळ्या आपण मागवत आहोत परंतु इथे मिळणारा आहारच आता उत्तम दर्जाचा मिळत नाही.धान्ये कडधान्य ही सुद्धा उत्तम प्रतिची मिळत नाही याच्याबद्दल तुमचे मत काय आहे. समोरच्याला सामाजिक प्रश्नांबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारे बाबा हे परिवर्तनासाठीची अखंड प्रेरणा होते.केवळ निवडणुका होणे लोकप्रतिनिधी निवडून येणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकांच्या सक्रिय सहभागातून जी निर्माण होते ती लोकशाही या आपल्या जाणीवेशी प्रामाणिक राहात वयाच्या 95 व्या वर्षी निवडणुकांमध्ये झालेल्या गैरकारभाराविरुद्ध बाबा उपोषणाला बसले.अलीकडेच आलेल्या जीवघेण्या पूर परिस्थितीमध्ये सरकार पूर परिस्थितीचा आढावा घेण्यामध्ये दंग होते. बाबा मात्र तत्परतेने गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला बसले आणि शक्य तितकी मदत गोळा करून ती पूरग्रस्तांसाठी पाठविली. तातडीच्या वेळेला विचार नाही तर उपचार करायचे असतात ही जाणीव डॉ. बाबा आढाव यांनाच असू शकते.

आजाराने शरीर ग्रासले असले तरी चिकित्सा ही मनापासून सुरू करायची याची पक्की जाणीव बाबांना होती.यामुळेच लोकांच्या मनाचा ठाव घेत माणसांची बांधणी करणं बाबांना शक्य झालं. भेटतील तेव्हा केवड्याचा सुगंध सर्वांना सढळं हस्ताने वाटणारे बाबा. लहान मूल समोर येतात खिशातून चॉकलेट काढून देणारे बाबा. माणूस जवळ येताच मायेने पाठीवर हात फिरवणारे बाबा हे खऱ्या अर्थाने युगपुरुष होते. लढवय्ये होते. फक्त राज्यकर्त्यांनाच नव्हे तर मृत्यूला देखील चकवा देऊन सत्य सर्वांचे आदीघर सर्व धर्मांचे माहेर हे अखंड पुनरुचार करते झाले.हरपलेली शांतता वाढलेली विषमता संपलेला सामाजिक सलोखा यामुळे अस्वस्थ असणारे भवताल पाहून स्वतः अस्वस्थ होणारा आणि या परिस्थितीवर मात करता येईल यासाठी प्रामाणिकपणे झटणारा एक सिद्ध हस्त चिकित्सक डॉक्टर आपण गमावला आहे ही सामाजिक आरोग्याची कधीही भरून काढता येणार नाही अशी झालेली हानी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baba Adhav Passes: A Doctor Who Cured Social Exploitation!

Web Summary : Dr. Baba Adhav, a true social doctor, dedicated his life to fighting for the rights of unorganized laborers like headloaders and waste pickers. He established the Hamal Panchayat, advocating for their welfare and pioneering labor laws. His work championed equality and social justice, leaving a lasting impact.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे