वराळे गावाला दहा लाख रुपयांचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST2021-02-13T04:11:27+5:302021-02-13T04:11:27+5:30
राज्याचे माजी दिवंगत ग्रामविकास व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ ही योजना सुरू ...

वराळे गावाला दहा लाख रुपयांचा पुरस्कार
राज्याचे माजी दिवंगत ग्रामविकास व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत वराळे गावाने सहभाग नोंदवला होता. त्याप्रमाणे वराळे गावची तपासणी शिरूर पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, शिरूर पंचायत समिती विस्तार अधिकारी बी. आर. गायकवाड, एस. के. शिंदे, शिरूरचे ग्रामसेवक आर. डी. रासकर यांच्या पथकाने करून शासनाला अहवाल सादर केला होता. यामध्ये वराळे ग्रामपंचायत करवसुली शंभर टक्के आहे. गावात पाणी पुरवठा व नियोजन, आरोग्य विषयी साथीचे आजार, विविध रोगांचे निर्मूलन, गावात झालेली विकासकामे, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, अंगणवाडी, मराठी शाळा, दशक्रिया घाट, सभागृह, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांना ग्रामपंचायतकडून पुरवल्या जाणाऱ्या सोईसुविधा आदींची पाहणी करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांच्या आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहचवण्यात यश मिळवले आहे. गावातील विविध विकासकामे वेळेत पूर्ण केली आहेत. लोकांसाठी सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्याने वराळे गावाला दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.