शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:53 IST

एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मान्यता दिल्याच्या विरोधात केले आंदोलन (ST Strike)

पुणे : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीनंतर संप पुकारला आहे. गावी गेलेल्या लोकांचे संपामुळे प्रचंड हाल  होऊ लागले आहेत. तसेच एसटी प्रशासनाला कोट्यावधीचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मान्यता दिली आहे. या निर्णयाविरोधात पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ आंदोलन केले आहे. राज्य सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आमचे विलीनीकरण करावे अशी मागणी आंदोलकांकडून जोर धरू लागली आहे.

शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे सकाळी ६ वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन  करण्यात आले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. 

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसेस जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागांमध्येदेखील सोडण्याच्या पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. प्रवाशांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी असे आवाहन केले आहे. 

प्रवाशांना बसत होता फटका 

एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिवाळीत झालेली भाडेवाढ सहन करीत एसटीचा प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करण्यास इच्छुक आहे. मात्र संपामुळे त्याची मोठी गैरसोय होत आहे. त्याला दुप्पट व तिप्पट दर देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास कराव लागत असल्याने मोठा फटका बसत होता.  

एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका

एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास १२० पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे. 

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपGovernmentसरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMONEYपैसा