शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मोपेलवारांच्या चौकशीचा अहवाल देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 8:41 PM

‘त्रिसदस्यीय समितीची नस्ती सादर करण्यात आली असून ती प्राप्त झाली नाही’ असे अजब उत्तर देऊन मोपलवार यांची माहिती नाकारण्यात आली आहे.

ठळक मुद्देशासनाने दिले अजब उत्तर : समृध्दी महामार्ग गैरव्यवहार प्रकरण

पुणे : राज्य शासनाच्याच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भ्रष्टाचाराची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालाची प्रत माहिती अधिकारांतर्गत मागितली असता ‘त्रिसदस्यीय समितीची नस्ती सादर करण्यात आली असून ती प्राप्त झाली नाही’ असे अजब उत्तर देऊन माहिती नाकारण्यात आली आहे.पुण्यातील सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मोपलवार यांच्या चौकशीच्या अहवालाची प्रत मंत्रालयातील प्रशासन विभागाकडे मागितली होती. त्यांनी पहिल्यांदा २९ डिसेंबर २०१७ रोजी याबाबत अर्ज केला असता अहवालावरील कार्यवाही प्रलंबित असल्याचे उत्तर देण्यात आले होते.  सेवानिवृत्त मुख्यसचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने राधेश्याम मोपलवार यांची चौकशी करून त्यांना क्लिनचीट दिली. त्यानुसार मोपलवार यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या निवृत्तीनंतर मोपलवार यांना मुदतवाढीचे बक्षीसही शासनाकडून देण्यात आले. चौकशी अहवालावरील कार्यवाही पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाल्याने वेलणकर यांनी पुन्हा माहिती अधिकरामध्ये मोपलवार यांच्या चौकशी अहवालाची प्रत मागितली. त्याबाबत मंत्रालयातील अवर सचिव व जनमाहिती अधिकारी ज. बा. कुलकर्णी यांनी अजब उत्तर देऊन माहिती नाकारली आहे. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबतची नस्ती सादर करण्यात आली असून ती अद्याप प्राप्त झालेली नाही, त्यामुळे सद्यस्थितीत माहिती उपलब्ध करून देता येत नाही असे उत्तर कुलकर्णी यांनी दिले आहे. यामुळे मोपलवारांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोपलवारांना नेमक्या कशाच्या आधारे क्लिनचीट मिळाली हे समोर येणे आवश्यक असल्याचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.  ......राधेश्याम मोपेलवारांच्या चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर मी माहिती अधिकाराचा अर्ज करून त्याची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र या अहवालावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगून मी माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर मोपलवार निवृत्त झाले तरी अहवाल व त्यावरील कारवाई गुलदस्त्यातच राहिली. निवृत्तीनंतर लगेचच मोपलवारांना एक वषार्साठी मुदतवाढ देणात आली . त्यामुळे अहवालावरील कार्यवाही पूर्ण झाली असल्याने मी परत एकदा अहवालाची प्रत मागणी माहिती अधिकारात मागितली. मला एक अनाकलनीय उत्तर देऊन पुन्हा माहिती देण्याचे नाकारले आहे.- विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते 

टॅग्स :PuneपुणेVivek Velankarविवेक वेलणकरRadhyeshyam Mopalwarराधेश्याम मोपलवारSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग