शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

टाळा ठोकून कामकाज बंद पाडू; पथारी धारकांचा गंभीर इशारा, पिंपरी महापालिकेवर मोर्चा

By विश्वास मोरे | Updated: August 14, 2024 18:15 IST

पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, टपरी, पथारी हातगाडी धारकरकांवर सतत अन्यायकारक कारवाई होतीये

पिंपरी : सन २०२३ च्या सर्वेनुसार शहरातील सर्व टपरी, पथारी, हातगाडीधारकांना येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर परवाना द्या. अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेला टाळा ठोकून महापालिका कामकाज बंद पाडू, असा गंभीर इशारा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला. टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या प्रश्नांवर संघटनेच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिका मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाबा कांबळे बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले की, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील गोरगरीब, कष्टकरी, बहुजन, मागासवर्गीय कष्टकरी शेतमजूर यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणपणाने लढा दिला. आता अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. परंतु स्वातंत्र्य काळामध्ये गोरगरीब कष्टकरी, मागासवर्गीय, बहुजन यांच्या अवहेलना चालूच आहेत. श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, टपरी, पथारी हातगाडी धारकरकांवर सतत अन्यायकारक कारवाई होत आहे. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न सोडवण्याबाबत मागणी केली होती. निवेदनही सादर केले होते. मात्र नकारात्मक तोडगा निघत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्याची वेळ आली. आगामी काळात अधिक आक्रमक आंदोलन करून मागण्या मान्य करायला भाग पाडू.

संघटनेच्या वतीने मांडलेल्या मागण्या

१) पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये. २) 2023 मध्ये सर्वेक्षण झालेल्या सर्व लाभार्थ्यांना तातडीने परवाना द्या. ३) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पात्र टपरी, पथारी, हातगाडी, फळभाजी विक्रेते यांचे पक्क्या गळ्यात पुनर्वसन करा.  त्या ठिकाणी लाईट, पाणी, स्वच्छता गृह आदी सुविधा द्या.४) फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा. ५) टपरी पथारी हातगाडी धारकांना सामाजिक सुरक्षा द्या.६) पीएम स्वनिधीद्वारे एक लाख रुपये कर्ज व त्यात ५० टक्के अनुदान सुरू करा. ७) टपरी, पथारी, हातगाडी धारकांना आरोग्य विमा अपघाती विमा व इतर कल्याणकारी योजना सुरू करा. ८) शहरात प्रथम व सर्वात मोठी संघटना म्हणून टपरी, पथारी; हातगाडी पंचायत या संघटनेस विश्वासात घ्या. ९) स्मार्ट सिटी व स्ट्रीट वेंडर्स योजने अंतर्गत शहरातील सर्व हातगाडी व टपरीधारकांना महापालिके मार्फत आधुनिक पद्धतीने हातगाडी व स्टॅन्ड उपलब्ध करून द्या. इतर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाagitationआंदोलनSocialसामाजिकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड