शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत वीज विघ्न टाळा..! महावितरणचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:52 IST

सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी.

ठळक मुद्देविसर्जनकाळात स्थापणार नियंत्रण कक्षमोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार

पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी आलेले नागरिकांनी वीजयंत्रणेपासून दूर रहावे आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे, मिरवणूकीतील वाहनांचा वीज वितरण यंत्रणेला स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. मुख्य मिरवणुक रस्त्यावर दक्षतेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. तसेच, लहान मुले आाणि नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा अथवा फिडर पिलरवर चढू नये, त्याचा आधार घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकी दरम्यान पथदिवे, फिडर पिलर अथवा अन्य कोणत्याही वीजयंत्रणेला स्पर्श करू नये. कोणी असा प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर जाण्यास भाग पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे.पुणे परिमंडलातील गणेश विसर्जनाच्या कालावधीत मोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रस्ता व टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी परिसरात महावितरणचा तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे. अभियंते व जनमित्रांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली असून मिरवणुक संपेपर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरु राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या कालावधीत विद्युत सेवेबाबत काही अडचणी आल्यास अथवा अन्य माहिती द्यावयाची असल्यास संबंधित परिसरातील अभियंते आणि महावितरणच्या १९१२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा १८००१०२३४३५ अथवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनmahavitaranमहावितरणAccidentअपघात