शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसमध्ये अदलाबदली टाळा : आयुष प्रसाद यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 19:15 IST

दोन्ही डोस एकाच लसीचे देण्याच्या सूचना

ठळक मुद्देलसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीचे फलक लावण्याचे आदेशनागरिकांना तुम्ही कोणती लस घेत आहात, याची माहिती असणे आवश्यक

दोन्ही डोस एकाच लसीचे देण्याच्या सूचना : लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीचे फलक लावण्याचे आदेश

पुणे : जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे ३५ हजार डोस उपलबद्ध झाले आहेत. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना पूर्वी घेतलेल्या लसीचास डोस देण्यात यावा. लसीच्या डोस मध्ये अदलाबदल टाळण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील लसीकरण केंद्राना दिले आहे. या सोबतच केंद्रावर उलब्ध असलेल्या लसीची माहिती दर्शनी भागात फलकांवर लावन्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात कोविशिल्ड बरोबरच कोव्हॅक्सिनचीदेखील लस देण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणती लस दिली जाणार, याबाबत लसीकरण केंद्राच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून ६० वर्षांवरील वृद्ध नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सुरवात झाली आहे. ११४ केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. त्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सीनचे ५० हजार डोस असे १ लाख डोस मिळाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडला त्याचे वाटप करण्यात आले आहेत. लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर कोव्हॅक्सिन लस ही केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच देण्यात आली. परंतु, लस उपलब्धतेनुसार शहरासह ग्रामीण भागातील इतर केंद्रावर देखील कोव्हॅक्सिन देण्यास सुरूवात केली. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना सोमवारी ३५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामधील २० हजार कोविशिल्डचे तर १५ हजार हे कोव्हॅक्सिनचे डोस आहेत.

अनेकांनी पहिला डोस हा कोविशिल्डचा घेतला आहे. तर काहींनी  डोस घेतला आहे. दुसरा डोस घेताना संबंधितांनी जी पहिली लस घेतली आहे, त्या लसीचाच डोस त्यांनी दुसऱ्या वेळेच्या कोव्हॅक्सिन लसीकरणाला द्यावा. त्यात अदलाबदल नको असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. यासोबतच नागरिकांना तुम्ही कोणती लस घेत आहात, याची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय अनेकदा नागरिकांकडून देखील हा प्रश्न विचारला जात असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत लसीकरण केंद्राबाहेर कोणती लस दिली जाणार त्याचे फलक लावण्यास सांगितले आहे.--

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल