शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात पावसाने ओलांडली जूनची सरासरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 19:59 IST

यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. अधूनमधून बरसत पावसाने जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली आहे.

ठळक मुद्देजून महिन्यात सरासरी १४२.४ मिलिमीटर पावसाची नोंदयावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस

पुणे : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. काही दिवस तो चांगला बरसला मात्र, नंतर गायब झाला. त्यानंतर तो अधूनमधून बरसत राहिला. त्यामुळे या महिन्यात दमदार पाऊस झाला नाही असे वाटत असताना त्याने मात्र या महिन्याची सरासरी ओलांडली आहे. अधूनमधून बरसत पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत १४२.८ पावसाची नोंद झाली आहे. पावसाने धरणसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नसून खरीपाच्या पेरण्यांची परिस्थितीही बरी नाही. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंत १४२.८ मिलिमीटर  (एकूण १,८५६.८ मिलिमीटर) पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये बारामतीत ७८.५ मिमी पाऊस होतो. या वर्षी ११०.१ मिलिमीटर झाला आहे. तर, इंदापूरला ९७.२ मिमी नोंद होते, या वर्षी १०४.३  तर पुरंदर तालुक्यात ८८.७ मिमी पाऊस होतो तो या वर्षी १२९.६ मिमी झाला आहे. या महिन्यात हवेली, शिरूर व खेड या तालुक्यांत अद्याप पावसाने सरासरी ओलांडली नाही. मात्र, येथे सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे. तालुक्यानुसार झालेला पाऊस हवेली : ८९.४मुळशी : २५६.७भोर : १९७.६मावळ : २९५.५वेल्हा : २५४.२जुन्नर : १0५.६खेड : ९१.५आंबेगाव : १२२.0शिरूर : ५१.८बारामती : ११0.१इंदापूर : १0४.३दौैंड : ४८.३पुरंदर : १२९.६एकूण : १८५६.६

 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरBaramatiबारामतीShirurशिरुरRainपाऊस