शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी लवकरच लोहगाव विमानतळावर होणार सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:44 IST

लवकरच जगभरात मालाची निर्यात करण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देपुण्यातून निर्यात वाढविण्यासाठी विमान कंपन्यांशी करण्यात आली चर्चाजागेची कमतरता भासत असून विस्तारासाठी अतिरिक्त १५ एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरू

पुणे : लोहगाव विमानतळावर सध्या दररोज १५ ते २० टन मालवाहतूक क्षमता असलेली आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा आहे. मात्र, सध्या केवळ जर्मनी, अबुधाबी आणि दोन दुबई अशा चारच ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानांची सुविधा आहे. त्यातही केवळ दुबईलाच निर्यात होते. लवकरच जगभरात मालाची निर्यात करण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी ही माहिती दिली. या वेळी खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. पुण्यातून निर्यात वाढविण्यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातून प्रवासी विमानाने देशातील अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळांवर माल पोहोचविला जाईल. त्या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानाने जगभर माल पाठविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर युरोप, अमेरिकेसह जगभरात मालवाहतूक करता येणार आहे. विमानतळासाठी सध्या जागेची कमतरता भासत असून विस्तारासाठी अतिरिक्त १५ एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणासाठी १,००० मीटर धावपट्टीची आवश्यकता आहे. त्यासाठीही जागा आवश्यक आहे. धावपट्टी विस्तारीकरणानंतर आंतरराष्ट्रीय विमान सुविधा तसेच आयात निर्यात सुविधा वाढविणेही शक्य होणार असल्याचे अजय कुमार यांनी स्पष्ट केले. 

नवीन टर्मिनलला मंजुरीविमानतळावर ४२ हजार चौरस मीटर क्षेत्रपळ असणाऱ्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. हे काम मे २०१८पासून प्रत्यक्ष सुरू होईल. त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर, आॅक्टोबरपर्यंत नवीन ५ पार्किंग बे तयार करण्याचे काम पूर्ण होईल. सध्या पार्किंगसाठी जागा कमी असल्याने काही वेळा विमान उड्डाणात किंवा उतरण्यात अडथळे येतात. विस्तारीकरणानंतर विमानतळावर १० विमाने एकाच वेळी हाताळता येतील. विमानतळाबाहेर वाहनांसाठी बहुमजली पार्किंग सुविधा केली जाणार आहे. त्यामुळे किमान एक हजार कारचे पार्किंग करता येईल, असे अजय कुमार यांनी नमूद केले.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळanil shiroleअनिल शिरोळेPuneपुणे