माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी मदतीचा ओघ
By Admin | Updated: August 4, 2014 04:20 IST2014-08-04T04:20:39+5:302014-08-04T04:20:39+5:30
माळीण येथील दुर्घटनेनंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे

माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी मदतीचा ओघ
मंचर : माळीण येथील दुर्घटनेनंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेने १० हजार डॉलर्सची मदत पाठविली असून पुनर्वसनासाठी ७५ हजार डॉलर्सचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
माळीण दुर्घटनेनंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील मदतकार्यावर स्वत: लक्ष ठेवून आहे. त्यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी त्यांच्या शिकागो (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयाला घटनेचा अहवाल पाठविला होता. त्यानुसार लायन्स क्लबने तत्काळ दहा हजार डॉलर्सची मदत देऊ केली. या रकमेचा उपयोग दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांना पाणी, खाणे, औषधे, कपडे, भांडी या स्वरूपात पुरविले जाणार आहे.
लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची आज भेट घेतली. प्रांतपाल विक्रांत यादव, शशिकांत वाजगे, डॉ.सदानंद राऊत, विवेक मुळे, दीपक वारुळे, संदीप मुथ्था, जितेंद्र गुंजाळ, अजय चोरडिया, मच्छिंद्र मुंडलीक, विकास दरेकर, अभय शास्त्री, डॉ. विलास नायकोडी आदी उपस्थित होते. लायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी मदतकार्याविषयी वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली. प्रांतपाल विक्रांत यादव म्हणाले, ‘‘माळीण येथे जाऊन आम्ही भेट दिली असून, मास्क, हातमोजे, तसेच औषधे मदत दिली आहे. घरे बांधून पुनर्वसनासाठी ७५ हजार डॉलर मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठविला असून, लायन्स क्लबच्या शिकागो येथील मुख्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. देशातील लायन्सच्या इतर क्लबकडून सुमारे १० हजार डॉलर्सची मदत मिळू शकते,’’ असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
बेलसरवाडी येथील बैलगाडामालक एम. गावडे यांच्या मुलाचा साक्षीगंध अवसरी येथे आज होता. गावडे यांनी सकारात्मक फाटा देऊन ती रक्कम माळीण दुर्घटनेच्या पुनर्वसनासाठी देऊ केली.
(पान ८ वर)