आहुपे गावात दारूबंदी
By Admin | Updated: July 17, 2014 03:33 IST2014-07-17T03:33:27+5:302014-07-17T03:33:27+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जुने आंबेगाव गावठाण वसाहत व आहुपे या गावांमध्ये संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे

आहुपे गावात दारूबंदी
घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जुने आंबेगाव गावठाण वसाहत व आहुपे या गावांमध्ये संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी या गावांमध्ये जाऊन फलकाचे उद्घाटन केले व ग्रामस्थांना दारूबंदी टिकवण्याचे आवाहन केले.
या गावांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, पोलीस हवालदार विनोद पवार यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना दारूबंदी टिकवण्याचे आवाहन केले. आंबेगाव गावठाण वसाहत येथे झालेल्या कार्यक्रमात सोनाली वळणे, मनीषा वळणे, गंगूबाई काळे, कमलाबाई असवले, हिराबाई काळे, हिराबाई मुकणे, मंदा मुकणे, ताईबाई वाघ, कांताबाई पवार हे उपस्थित होते; तर आहुपे येथे दारूबंदी कमिटीचे अध्यक्ष धर्मा असवले, विजय असवले, चंदर सातपुते, नंदू साळवे, ज्ञानेश्वर लोहकरे, किसन असवले, चंदर लोखंडे, सरपंच साधना असवले, उपसरपंच शंकर लांघी, शाहुबाई असवले, पोलीस हवालदार आर. पी. हांडे हे उपस्थित होते. (वार्ताहर)