पिस्तूल बाळगणार्या रिक्षाचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:12 IST2021-07-30T04:12:13+5:302021-07-30T04:12:13+5:30
पुणे : गावठी पिस्तुल बाळगणार्या एका रिक्षाचालकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विनोद वामन आल्हाट (वय ३७) असे या ...

पिस्तूल बाळगणार्या रिक्षाचालकास अटक
पुणे : गावठी पिस्तुल बाळगणार्या एका रिक्षाचालकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
विनोद वामन आल्हाट (वय ३७) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि २ काडतुसे असा ४० हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आल्हाट हा मांगीरबाबा मंदिराजवळ त्याच्या मित्राला भेटण्यासाठी थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार कुंदन शिंदे, पोलिस अंमलदार अमित सुर्वे आणि अक्षयकुमार वाबळे यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी आल्हाट याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. हे पिस्तूल आणि काडतुसे त्यांनी कोठून आणली?, हे जवळ बाळगण्यामागे त्याचा काय उद्देश होता?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्याने या पूर्वी कोणते गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. न्यायालयाने त्याला आल्हाट याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
–