शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उर्वशी रौतेलाचा कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांचा चढला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:47 IST

९९९ रुपयांपासून ते थेट ३० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे

ठळक मुद्देनववर्ष स्वागत पार्टी : प्रेक्षकांनी व्यक्त केला आयोजकांवर संतापआयोजकांचे ढिसाळ नियोजन आणि पोलिसांनी नाकारलेली परवानगी

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी खराडी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी  बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेलाला बोलावण्यात आले होते. त्यासाठी ९९९ रुपयांपासून ते थेट ३० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे ठेवण्यात आली होती; परंतु, आयोजकांचे ढिसाळ नियोजन आणि पोलिसांनी नाकारलेली परवानगी यामुळे हा कार्यक्रमच होऊ शकला नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी आयोजकांवर संताप व्यक्त केला.नववर्षाच्या स्वागताकरिता सर्वत्र जय्यत तयारी केली जाते; तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क, मुंढवा, खराडी, हिंजवडी आदी परिसरामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आॅनलाइन तिकीटविक्री करण्यात आली होती. साधारणपणे ९९९ रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंत तिकिटे ग्राहकांनी खरेदी केलेली होती. परंतु, उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पाहणाºया प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झाला. याबद्दल काही प्रेक्षकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या. दरम्यान, दर वर्षी कोरेगाव भीमाला अभिवादन कार्यक्रम होतो, या भागातील रस्ते बंद केले जातात याची माहिती आयोजकांना नव्हती का, तसेच आयोजकांनी पोलिसांना परवानगीकरिता उशिरा कागदपत्रे का दिली? असे प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत. ......ग्राहकांना आठ दिवसांत पैसे परत देणारपोलिसांनी या कार्यक्रमाला ऐनवेळी परवानगी नाकारल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता मंगळवारी सायंकाळी सहानंतर या भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. हा कार्यक्रम काही दिवसांनंतर घ्यावा की न घ्यावा, यासंदर्भात इव्हेंट कंपनी निर्णय घेणार असली, तरी प्रेक्षकांना मात्र त्यांचे पैसे कधी परत मिळणार? अशी विचारणा होत आहे. दरम्यान, आॅनलाइन तिकिटे दिलेल्या पेमेंट कंपन्या ग्राहकांना त्यांचे पैसे रिफंड करणार आहेत. येत्या आठ दिवसांत हे पैसे परत मिळतील. तसे मेसेज ग्राहकांना पाठविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :urvashi rautelaउर्वशी रौतेलाbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा