जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली स्वीकृत सदस्यपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.
अनिल वीरकर यांची स्वीकृत सदस्य पदाची मुदत संपल्याने ही निवडणूक घेण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सवर काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमिना पानसरे याही सहभागी होत्या. आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरध्यक्षा वीणा सोनवणे ,उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक अजिंक्य देशमुख, बाळासाहेब सातभाई,महेश दरेकर,गणेश शिंदे,नगरसेविका रुक्मिणी जगताप,शीतल बयास पौर्णिमा राऊत ,तसेच मुख्याधिकारी पूनम कदम उपस्थित होते.
यावेळी अतुल सावंत यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सावंत यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी मोहन महाजन, हेमंत सोनवणे, मनोहर भापकर, रमेश बयास, रमेश गावडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
२८ जेजुरी
स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर अतुल सावंत यांचा सत्कार करताना नगराध्यक्षा व इतर.