श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:15+5:302021-03-04T04:17:15+5:30

देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य आदी धार्मिक विधी करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी नानासाहेब ...

Attractive flower decoration to Shri Mahaganapati Mandir | श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य आदी धार्मिक विधी करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकर पाचुंदकर यांच्या वतीने अर्पण केलेल्या फुलांची मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीमहागणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याचे विश्वस्त ॲड. विजयराज दरेकर व व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी सांगितले.मात्र, मंदिर प्रशासना कडून मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने भाविकांनी प्रवेशद्वारावरून श्री महागणपतीचे दर्शन घेणे पसंत केले.

त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ.संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्री महागणपती

Web Title: Attractive flower decoration to Shri Mahaganapati Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.