शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या दस्त नोंदणीवर ‘नजर’;‘एक राज्य, एक नोंदणी’ उपक्रमात दक्षता पथकाची हाेणार स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:18 IST

- चुकीच्या दस्तांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीसह बडतर्फीची कारवाई

पुणे : ‘एक राज्य, एक नोंदणी’ या उपक्रमात राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जास्त नोंदणी करता येणार आहे. यात गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने आतापासूनच दक्षता विभागाची स्थापना करण्याचे ठरविले आहे. यातून चुकीच्या दस्तांवर ‘नजर’ ठेवण्यात येणार असून, पारदर्शकपणे काम होण्यास मदत होणार आहे. अशा चुकीच्या दस्तांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीसह बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली. या दक्षता पथकात सुमारे ४३ ते ४४ अधिकारी व कर्मचारी असतील.राज्यात सध्या एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयांमध्ये केली जाते. अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुसऱ्या जिल्ह्यात जमीन, घर खरेदीचे व्यवहार करतात अशांना संबंधित जिल्हा सहनिबंधक कार्यालयात जाऊन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यावर तोडगा काढण्यासाठी राज्यात ‘एक राज्य, एक नोंदणी’ हा उपक्रम सुरुवातीला मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत १७ फेब्रुवारीपासून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.या उपक्रमात तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेत चुकीच्या दस्तांची नोंद होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गैरव्यवहार लपविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नोंदणीची शक्यता लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यस्तरावर दक्षता पथकाची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. याबाबत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे म्हणाले की, “कार्यक्षेत्राबाहेरील दस्तांची नोंदणी संशयास्पद पद्धतीने होत असल्यास हे दक्षता पथक त्यावर लक्ष ठेवणार आहे. अशा दस्तांची तपासणी करून त्यात गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यात विभागीय चौकशीपासून बडतर्फीच्या कारवाईचा समावेश आहे.”या दक्षता पथकाची नव्यानेच स्थापना करण्यात येणार असल्याने नोंदणी महानिरीक्षकांनी विभागाचा स्वतंत्र आकृतिबंध तयार करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. या पथकात राज्य स्तरावर एक नोंदणी उपमहानिरीक्षकाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. तर क्षेत्रीय स्तरावर सहजिल्हा निबंधकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पथकात सुमारे ४३ ते ४४ अधिकारी व कर्मचारी असतील. या पथकामुळे चुकीच्या दस्तांची नोंदणी टाळता येणार आहे. तसेच परिणामकारक पद्धतीने काम होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महसुलातही वाढ होणार असल्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी सांगितले. या पथकासह विभागात अन्य पदांचाही आकृतिबंध प्रस्तावित असून, त्यात सध्याच्या ३ हजार ९४ पदांमध्ये ९७२ पदांची वाढ सुचविण्यात आली आहे. त्यानुसार ही संख्या ३ हजार ९९५ इतकी होणार आहे. तर ७१ पदे रद्द होणार आहेत.

या उपक्रमात राज्यात होणारी सर्व दस्तनोंदणी एकाच वेळी दिसू शकणार आहे. राज्यस्तरावरून यावर लक्ष ठेवण्यात येईल. सदोष दस्तांवर, तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.  - रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकार