आमदाराच्या नावाने खंडणी मागणारे अटकेत
By Admin | Updated: July 19, 2014 23:26 IST2014-07-19T23:26:09+5:302014-07-19T23:26:09+5:30
आमदार विनायक निम्हण यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून गोरगरिबांना देवदर्शनासाठी नेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

आमदाराच्या नावाने खंडणी मागणारे अटकेत
पुणो : आमदार विनायक निम्हण यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून गोरगरिबांना देवदर्शनासाठी नेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देणा:याला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. तर, इतर तीन आरोपींना खडक पोलिसांनी पकडून समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
इब्राहिम फारूख शरीफ शेख (वय 26, रा. 596 गंज पेठ), प्रसाद ऊर्फ बंटी प्रकाश शेलार (वय 29, रा. गोकूळनगर, कोंढवा), सुरेश ऊर्फ भुरा बंडू कांबळे (वय 26, रा. गंज पेठ), विशाल अरुण शेडगे (वय 26, रा. घोरपडी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखिल जयंतीलाल ओसवाल (वय 27, रा. लुल्लानगर) यांनी फिर्याद दिली आहे. निखिल यांचे वडील जयंतीलाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. निखिल त्यांना व्यवसायात मदत करतात.
आरोपींनी त्यांना स्वीटी असोसिएट्स या कार्यालयातील टेलीफोनवर फोन केला. आपण आमदार विनायक निम्हण यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून गोरगरिबांना देवदर्शनासाठी घेऊन जाणार असल्याचे भासवले. निखिल यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. परंतु, पैसे देण्यास निखिल यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने गाठ माङयाशी आहे, असे म्हणून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. याबाबत आमदार विनायक निम्हण यांनी सांगितले, की आपल्या नावाने खंडणी मागितली जात असल्याचे समजल्यावर, आपण पुढाकार घेऊन पोलिसांना कळविले होत़े