उधार न दिल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST2020-12-09T04:10:44+5:302020-12-09T04:10:44+5:30

याप्रकरणी जावेद शेख (वय ४०, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलिसांनी बबन उर्फ अरबाज इकबाल ...

Attempted murder of youth without lending | उधार न दिल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

उधार न दिल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

याप्रकरणी जावेद शेख (वय ४०, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलिसांनी बबन उर्फ अरबाज इकबाल शेख (वय २२, रा. भवानी पेठ) अतहर मुझफर सैय्यद (वय २२,रा. गुरुनानक नगर), सकलेन युनूस खुरेशी (वय २० रा. कोंढवा) या तिघां विरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. यातील बबन उर्फ अरबाज व सकलेन हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हा दाखल आहे. ही घटना चुडामण तालीम चौकातील लिमरा रेस्टॉरंट येथे रविवारी रात्री पावणे दहा वाजता घडली.

जावेद यांचा पुतन्या जुबेर शेख याने अरबाज शेखला तंदुरी उधार दिली नाही. त्यातून त्याने जुबेरला शिवीगाळ केली होती. त्यामुळे जावेद हे अरबाजला समजावून सांगत होते. त्यावेळी अरबाज व त्याच्या साथीदारांनी

जावेद यांना शिवीगाळ केली. शेजारी चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून लाकडी दांडके घेऊन जावेद यांना खल्लास करण्याची धमकी देत डोक्यात पाठीवर व हातावर वार केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करत आम्ही येथील भाई आहोत, तुम्हाला नीट धंदा करायचा आहे की नाही असे म्हणत मोठ्याने ओरडत परिसरात दहशत निर्माण केली. अचानक झालेल्या राड्यामुळे नागरिकांनी घाबरुन धावपळ करत आपली दुकाने बंद केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास करत तिघांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.

Web Title: Attempted murder of youth without lending