नऊ जणांकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:54+5:302021-03-27T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेट्वर्क पुणे : नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून नऊ जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड व ...

नऊ जणांकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेट्वर्क
पुणे : नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून नऊ जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (दि.२४) रात्री आठच्या सुमारास तळजाई वसाहत पद्मावती परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी, अथर्व रवींद्र अडसूळ (वय १८, रा. पद्मावती) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू ऊर्फ डड्या संजय लोंढे (वय २५), मोन्या ऊर्फ जितेंद्र संजय लोंढे (वय २०), प्रशांत सुखदेव जाधव (वय १९), कृष्णा देवकुळे, विकास ऊर्फ विकी गायकवाड, सोमनाथ गायकवाड, ओम गायकवाड, रोहित खुडे, नान्या अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून यातील राजू व मोन्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात फिर्यादीने आरोपींना नशा करण्यासाठी पैसे दिले नव्हते. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर चिडून होते. त्यातूनच टोळक्याने संगनमत करून फिर्यादीला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.