पत्नीला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न, पती व दीर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:44+5:302021-02-05T05:10:44+5:30
याप्रकरणी यशोदा भागवत चौधरी ( वय २५, रा. पेठकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती भागवत सायप्पा ...

पत्नीला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न, पती व दीर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी यशोदा भागवत चौधरी ( वय २५, रा. पेठकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती भागवत सायप्पा चौधरी व दीर साईनाथ चौधरी ( रा. निगडी, पुणे ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार : ८ वर्षांपूर्वी यशोदा व भागवत यांचे लग्न झाले आहे. गेले २ वर्षांपासून पती भागवत चौधरी हा दारू पिऊन येऊन तिला शिवीगाळ मारहाण करीत असून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करीत आहे. भांडणे झाली की तिला माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करीत असतो. परंति कौटुंबिक बाब असल्याने तिने याबाबत यापूर्वी तक्रार केली नव्हती.
सदर बाब तिने आईवडील व भाऊ यांना सांगितली होती. परंतु आई वडिलांनी तिला इज्जतीचे भीतीपोटी व्यवस्थित नांदणेबाबत सांगितले होते व तिचे पतीला भांडणे न करण्याबाबत समज दिली होती. शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास यशोदा पती भागवत व त्यांचे २ मुली घरी असताना पती तिला त्याचा भाऊ साईनाथ याचे घरी चल, असे म्हणाला. यांवर तिने तुम्ही एकटे जा मी येत नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने घरातील स्टोव्हमधील डिझेल तिचे अंगावर ओतले व तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला जाळून माररून टाकतो असे म्हणत दोन तीन माचिसच्या काड्या ओढल्या त्यावेळी त्या पेटल्या नाहीत, परंतु नंतर पेटलेली काडी तिचे गाऊनला लावली त्यामुळे तिचा गाऊन व डोक्याचे केसाने पेट घेतला. ती ओरडत घराचे बाहेर आली. समयसूचकता दाखवून बाहेर ठेवलेले पाण्याचे बादलीतील पाणी डोक्यावरुन अंगावर ओतून घेतल्याने आग विझली. यामध्ये तिचा डावा खांदा, डोक्याची डावी बाजू व चेह-याची डावी बाजू जळाली आहे. आग विझलेनंतर पती भागवत हा तेथून निघून गेला व जाताना मला आता तरी थोडे भाजली आहे पुढचे वेळी जास्त भाजवीन अशी धमकी दिली. दीर साईनाथ यानेही यापूर्वी तिला एकदा जिवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणून तिने पती व दिराविरुद्ध तक्रार दिली.