कोंबड्या चोरल्याचे सांगितल्याच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:09 IST2021-04-05T04:09:58+5:302021-04-05T04:09:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कडकनाथ कोंबड्या चोरून नेल्याबाबत परिसरातील लोकांना सांगितल्याचा गैरसमज करून घेऊन तिघांनी एकावर कोयत्याने व ...

कोंबड्या चोरल्याचे सांगितल्याच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कडकनाथ कोंबड्या चोरून नेल्याबाबत परिसरातील लोकांना सांगितल्याचा गैरसमज करून घेऊन तिघांनी एकावर कोयत्याने व बिअरच्या बाटलीने वार करून जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी संदीप नथुराम खैरे (वय ४०, रा. दत्तनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी सचिन खैरे, पपुल्या आणि शुभम टेम्पो अशा तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
युवराज मित्र मंडळात गणपतीची आरती करताना २ एप्रिल रोजी गणेश खैरे, सागर बराटे यांच्यामध्ये भांडणे झाली होती. यावेळी संदीप खैरे यांनी त्यांना समजावून सांगितले होते. तसेच फिर्यादींच्या कडकनाथ कोंबड्या आरोपी सचिन खैरे याने चोरून नेल्याचे दत्तनगर परिसरात सांगून लोकांचा गैरसमज करून दिल्याच्या संशयावरून तिघांनी बिअरच्या बाटलीने त्यांच्या डाव्या कानावर व लोखंडी कोयत्याने डाव्या हाताच्या पंजावर, पायाच्या नडगीवर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीची पत्नी आणि नातेवाईकांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.