शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:10 IST

भारती विद्यापीठ पोलिसांची पिता- पुत्रांना अटक

पुणे : मुलाचा किरकोळ अपघाताचा राग मनात धरुन दोघांनी महिलांला मारहाण करुन ती खाली पडली असताना तिच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पितापुत्रांना अटक केली आहे.

असिफ अब्दुल रेहमान शिकीलकर (वय ५२, रा. मेमनवाडा, संतोषनगर, कात्रज) आणि अमिन असिफ शिकीलकर (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना संतोषनगर येथील दामगुडे बिल्डिंगमध्ये २० मे रोजी रात्री दहा वाजता घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकाशेजारी राहायला आहेत.

फिर्यादी व आरोपी यांचा मुलाचा किरकोळ अपघात झाला होता. त्याचा राग मनात धरुन आरोपी हे शिवीगाळ करुन बघून घेतो, अशी धमकी देत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे पती त्यांना समजाविण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या पोटावर, तसेच गुप्तांगावर लाथा मारुन त्यांचा विनयभंग केला.  त्या खाली पडल्या असताना त्यांच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :katrajकात्रजPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटक