पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:10 IST2021-05-21T04:10:10+5:302021-05-21T04:10:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून एकाला लाकडी दांडके व स्टंपने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी ...

पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून एकाला लाकडी दांडके व स्टंपने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
सचिन रावसाहेब तिजोरे (वय २९) आणि सागर रावसाहेब तिजोरे (वय २५, दोघे रा. चंद्रमानगर वसाहत, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना येरवड्यातील चंद्रमानगर वसाहत येथे बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सुरेश खरात (वय ३८, रा. चंद्रमानगर) यांनी फिर्याद दिली आहे. खरात हे बुधवारी सकाळी घरी असताना आरोपी त्यांच्या घरात शिरले. तू माझ्या भावाला नडला आहे. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लाकडी दांडके व स्टम्पने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वारंगुळे अधिक तपास करीत आहेत.