शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: जादूटोणा करीत असल्याचा संशय सुपारी घेत ज्येष्ठाच्या खुनाचा प्रयत्न; तिघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 12:30 IST

ज्येष्ठाच्या खुनाचा कट रचून दोन लाख रुपयांची सुपारीदेखील देण्यात आल्याचा प्रकार सहकारनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली....

पुणे : जादूटोणा करण्याच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. ज्येष्ठाच्या खुनाचा कट रचून दोन लाख रुपयांची सुपारीदेखील देण्यात आल्याचा प्रकार सहकारनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

सागर सतीश कुंभार (४१), तौरस बाळू कारले (४३, दोघे रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि सागर शशिकांत सोनार (३२, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १५ जून रोजी पद्मावती परिसरात सोनू पांडू होडे (६७, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. होडे यांच्या गळ्यावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. पदपथावर होडे गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. होडे यांच्या खुनाचा प्रयत्न का करण्यात आला, याबाबतची पोलिसांना मिळाली नव्हती.

दरम्यान, पोलिस तपासात होडे यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सागर कुंभार सुपर इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कुंभारला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी सागर सोनार याच्या सांगण्यावरून होडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची कबुली कुंभारने दिली. होडे यांचा खून करण्यासाठी सोनारने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती कुंभारने तपासात दिली. पोलिसांच्या पथकाने कुंभार, त्याचा साथीदार कारले आणि सोनारला ताब्यात घेतले. होडे जादूटोणा, भानामती, करणीसारखे प्रकार करत असून, त्यांनी आमचे घर बळाकावण्याचा प्रयत्न केला. होडे यांचा खून करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी कारले आणि कुंभार यांना सोनारने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सहायक पोलिस आयुक्त नंदिनी वग्याणी - पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक युवराज पोठरे, बापू खुटवड, अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित सुतकर, सागर कुंभार आणि विशाल वाघ यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे