शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांच्या चिंतेत वाढ

By दीपक होमकर | Updated: September 23, 2022 19:27 IST

ही घटना कोंढवा परिसरात येवलेवाडी गावात आज सकाळी सातच्या सुमारास घडली..

पुणे : येवलेवाडी येथील एकाच शाळेतील तीन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मुलींच्या हुशारीमुळे एकीचेही अपहरण झाले नसून तिघीही मुली सुखरुप आहे. याबाबत मुलींनी शाळेत आणि घरी सांगितल्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार केली आहे. ही घटना कोंढवा परिसरात येवलेवाडी गावात आज सकाळी सातच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आज (शुक्रवारी) सकाली सातच्या सुमारास येवलेवाडी परिसरातील एका शाळेमध्ये जाण्यासाठी शाळेची विद्यार्थीनी घरातून पायी निघाली होती. काही अंतर चालल्यावर रस्त्याच्या कडेला एका व्हॅॅनजवळील व्यक्तीने तिला आडवले आणि तुझी आई आजारी असून दवाखान्यात नेले आहे तुला तिकडेच नेण्यासाठी आम्हाला पाठवले असल्याचे त्यांनी मुलीला सांगितले. मात्र मुलीने सांगितले आत्ताच आईने मला शाळेत पाठवले आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही आणि मुलीने तेथून काढता पाय घेत पळत जवळ असलेली शाळा गाठली.

त्या मुलीच्या पाठोपाठ येणाऱ्या आणखी दोन मुलींंनाही हाच अनुभव आला. त्यातील एका मुलीला तर गाडीत बस म्हणून त्यांनी दमदाटीही केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र मुलींनी पळ काढून शाळा गाठली. ही बातमी शिक्षकांना सांगितल्यावर त्यांनी शिक्षकांनी मुख्यांध्यापकांना सांगितली त्यानंतर शिक्षकांनी शाळेच्या रस्त्यावर व परिसरात व्हॅनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र व्हॅन दिसली नाही. त्यानंतर मुख्याध्यापकांनी ही बाब पोलिसामध्ये तक्रार दाखल केली.टोळी दाखल झाल्याची अफवाचकोंढवामध्ये हे प्रकरण घडत असताना याच परिसरात असलेल्या लुल्ला नगर परिसरातील आणखी एका शाळेतील दोन मुलींची अपहरण घडले असल्याची बातमी आज कोंढवा परिसरात वाऱ्यासारखी पसरत होती. याबाबत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या की संबधीत शाळेत जाऊन आम्ही मुख्याध्यापकांना भेटलो. त्यांनी सर्व मुलींची मोजणी करून आम्हाला दाखविली शिवाय एकाही पालकांकडून मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नाहीत. त्यामुळे या परिसरात मुले पळविणारी टोळी दाखल झाल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. मुलांची विक्री केली गेल्याचे व्हिडीओ हा सुद्दा महाराष्ट्राच्या बाहेरचा जुना व्हिडीओ आहे व त्यामध्ये बरेच एडिटींग केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि असे व्हिडीओ दुसऱ्यांना पाठवू नये असे आवाहन पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKondhvaकोंढवाPoliceपोलिसKidnappingअपहरण