शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: धनकवडीच्या स्मशानभूमीत तरुणावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:59 IST

तरुण भाजला असून सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धनकवडी : धनकवडी स्मशानभूमीत एका तरुणा च्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये तरुण भाजला असून सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुरज विजय मरळ, वय २८ वर्षे, राहणार जिवनधारानगर, धनकवडी ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोविंद उर्फ सत्येंद्र यादव, राहणार (मागंडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी सुरज मरळ याचे धनकवडीमध्ये कपडे विक्रीचे छोटेसे दुकान होते. लॉक डाऊनमध्ये ते बंद पडल्याने तो सध्या घरातूनच कपड्यांची विक्री करतो. तर आरोपी गोविंद हा त्याला बालपणापासूनचा मित्र आहे. तो सध्या कोणतेही कामधंदे करत नाही. रविवारी सुरज हा कपडे विक्रीचे पैसे गोळाकरत असताना, त्याला गोविंद रस्त्यामध्ये भेटला. या नंतर दोघांनी मद्यपान केले आणि धनकवडी स्मशानभूमीत एकत्र गप्पा मारत बसले. रात्री दिडच्या सुमारास दारुच्या नशेत गोविंदने फिर्या दी सुरजला शिवीगाळ केली. यामध्ये वाद वाढत गेल्याने गोविंदने जवळचा सिमेंट ब्लॉक सुरज च्या डोक्‍यात मारला. यानंतर सुरजने वडिलांच्या गाडीत भरण्यासाठी आणलेली पेट्रोलची बाटली गोविंदने घेतली. यातील पेट्रोल सुरज्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले. सुरजने कसाबसा जखमी अवस्थेत आपला जीव वाचवला.  दरम्यान गोविंद घटनास्थळावरुन पळून गेला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे करत आहेत.

टॅग्स :DhankawadiधनकवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक