एटीएमची तोडफोड करून रोकड चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST2021-07-14T04:15:24+5:302021-07-14T04:15:24+5:30
राहुल कांताराम इचके (वय २६, रा. खांदवेनगर, वाघोली), संदीप शिवाजी निचित (वय ३०, रा. ठुबे पठारेनगर, खराडी) अशी अटक ...

एटीएमची तोडफोड करून रोकड चोरीचा प्रयत्न
राहुल कांताराम इचके (वय २६, रा. खांदवेनगर, वाघोली), संदीप शिवाजी निचित (वय ३०, रा. ठुबे पठारेनगर, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. खराडी भागात एका बँकेच्या एटीएम केंद्रात चोरटे शिरले असून चोरटे एटीएम यंत्राची तोडफोड करत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक एटीएम केंद्राजवळ पोहोचले. एटीएम यंत्राची तोडफोड करून रोकड चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे इचके आणि निचित यांना पकडले. ही कारवाई चंदननगर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गजानन जाधव, युसुफ पठाण, सचिन कळसाईत, संदीप पाटील, समीर शेख यांनी केली.
चोरट्यांनी शहरातील अन्य भागात एटीएम यंत्राची तोडफोड करून रोकड चोरी केल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.