पैशाच्या मागणीसाठी अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST2021-07-07T04:13:11+5:302021-07-07T04:13:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पैशाच्या मागणीसाठी दोघांचे अपहरण करून मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ...

पैशाच्या मागणीसाठी अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पैशाच्या मागणीसाठी दोघांचे अपहरण करून मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अविनाश पाटील (वय ३१), उत्तम तुरंबेकर (वय ३१, दोघे रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. प्रभात तोडकर, अजित राऊत अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत निखिल गुरव (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. ५ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता नऱ्हे परिसरात ही घटना घडली.
पैशाची मागणी करण्यासाठी आरोपींनी प्रभात, अजित यांना जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर प्रभात याला शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर अजित याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, गुन्हा करण्यामागचा हेतू काय होता? त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? त्यांनी अशाप्रकारे इतर गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली.
-----------