शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

UP तील मनरेगाचा ९२ कोटींचा बनावट धनादेश पुण्यात वटविण्याचा प्रयत्न फसला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 14:15 IST

याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

पुणे : उत्तर प्रदेशातील मनरेगा खात्याचा ९२ कोटी ९९ लाख रुपयांचा बनावट धनादेश पुण्यातील एचडीएफसी बँकेत वटविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (National Rural Employment Guarantee Act, 2005 fraud in pune). या प्रकरणी एच डी एफ सी बँकेचे शाखा व्यवस्थापक अश्विन मुकुंद यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उत्कर्ष कन्स्ट्रोवेल कंपनी( वाल्हेकर कॉम्प्लेक्स, नर्हे), प्रताप आण्णाराव पाटील (वय ३६, रा. अस्पायर टॉवर, हडपसर), दत्तात्रय कारमपुरी (रा. सोलापूर) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर यांनी सांगितले की, उत्कर्ष कन्स्ट्रोवेल ही कंपनी मेट्रो तसेच रस्ते बांधणीचे काम करते. तिचे एच डी एफ सी बँकेत खाते आहे. कंपनीच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लखनौ येथील जवाहर भवन शाखेचा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट स्कीम (मनरेगा) या खात्याचा धनादेश बनावट सह्या करुन त्यावर ९२ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम लिहिली. हा धनादेश कंपनीने आपल्या खात्यात भरला. एच डी एफ सी बँकेच्या अधिकाऱ्यांना या धनादेशाविषयी संशय आला. त्यांनी या धनादेशाची स्कॅन कॉपी त्यांच्या लखनौ शाखेकडे पाठविली. तेथील एच डी एफ सी बँकेतील अधिकारी स्टेट बँकेत जाऊन या धनादेशाविषयी चौकशी केल्यावर तो बनावट असल्याचे व या खात्यातील सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. असा धनादेश दिला गेला नसल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर बँकेने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उत्कर्ष कन्स्ट्रोवेल कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांना हा धनादेश प्रताप पाटील व दत्तात्रय कारमपुरी यांनी दिल्याचे कंपनीच्या मालकांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सलगर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी