शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 23:23 IST

या वेळी आजू बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. पण कोणीही पुढे झाले नाही

पुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याच्या कारणावरुन ८ जणांनी तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.सुमित बाबर (वय ३७, रा. कोंढवा खुर्द) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील महादेव बाबर यांच्या कार्यालयाजवळ रात्री आठ वाजता घडली. सुमित बाबर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. 

याबाबतची माहिती अशी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला. सुमित बाबर हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करतात. त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. त्या कारणावरुन बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ जणांनी सुमित बाबर याला ओढून रस्त्यावर आणले व काठी व दांडक्याने बेदम मारहाण केली. या वेळी आजू बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. पण कोणीही पुढे झाले नाही. सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. यामुळे कोंढवा भागात काही काळ तणाव निर्माण झाला. 

सुमित बाबर याला जखमी अवस्थेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तेथे त्याच्या डोक्यावर १७ टक्के घालण्यात आले. त्याचा हातही फॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.  या घटनेची माहिती समजताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असून आरोपी निष्पन्न झाले आहेत.  रात्री उशिरापर्यंत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. याबाबत आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक असल्याने मी मुंबईला आलो आहे. या घटनेची माहिती मला समजली. लोकशाहीमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा