गुलटेकडीत किरकोळ वादातून तरुणावर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST2021-05-25T04:11:24+5:302021-05-25T04:11:24+5:30
पुणे : किरकोळ वादातून तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईतांना खडक पोलिसांनी अटक केली. ही घटना २३ ...

गुलटेकडीत किरकोळ वादातून तरुणावर वार
पुणे : किरकोळ वादातून तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईतांना खडक पोलिसांनी अटक केली. ही घटना २३ मे रोजी मध्यरात्री गुलटेकडीतील डायस प्लॉटजवळ घडली. चिक्कू उर्फ इसतन्या खिलारे (वय १९) आणि सागर मावस (वय २०, रा. गुलटेकडी ) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. ऋषीकेश दिनेश खिलारे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश अशोक खिलारे (वय ४२, रा. गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ऋषीकेश मित्रांसोबत बाहेर फिरत होता. त्यावेळी तेथे आलेल्या सराईत चिक्कू आणि सागरने ऋषीकेशला शुभम वायदंडे कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी ऋषीकेशला शिवीगाळ करून शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.