शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

निघोजमध्ये निवडणुक वादातून एकाच्या घरावर हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 9:36 PM

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर, एका हॉटेलवर आणि चार वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

ठळक मुद्देहॉटेलवर दगडफेक : चार गाड्यांची तोडफोडएकाला मारहाण करण्यात येऊन त्याच्या मुलास जिवे मारण्याची धमकी

कुरळी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर, एका हॉटेलवर आणि चार वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एकाला मारहाण करण्यात येऊन त्याच्या मुलास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धक्कादायक घटना निघोजे (ता. खेड) येथे बुधवारी (दि. ४) रात्री घडली. या प्रकरणी येथील सात जणांवर चाकण पोलिसांत गुरुवारी (दि. ५) गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.  सतीश हिरामण येळवंडे (रा. निघोजे, कुरण वस्ती, ता. खेड, जि. पुणे) व त्याचे सहा अन्य साथीदार (नावे निष्पन्न नाहीत) यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली. संतोष शिंदे याने चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की  त्यांची आई शीला शिंदे या २००७ ते २०१२ दरम्यान जि. प. सदस्य होत्या, तसेच पत्नी कांचन या निघोजे गावाच्या २०१२ ते २०१७ दरम्यान सरपंच होत्या. मागील वर्षी २०१७मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या व विरोधकांच्या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने लढत झाली होती. त्यामुळे विरोधकांमध्ये मोठा द्वेष निर्माण झाला होता. तसेच गावात एक जमीन खरेदी केल्याच्या कारणावरून काही जणांनी जमीन मोजणीच्या वेळी शिवीगाळ व दमदाटी केली होती. बुधवारी (दि. ४) रात्री दहाच्या सुमारास जेवण करून घरातील सर्व जण झोपले असता अचानक घरावर दगडफेक सुरू झाली. सतीश येळवंडे व त्याचे साथीदार शिवीगाळ करीत दगडफेक करीत असल्याचे लक्षात आले. सतीश येळवंडेने संतोष शिंदे याला मोबाईलवर फोन करून घराबाहेर ये, तुझा खून करतो अशी धमकी दिली. तू निवडणुकीत आमच्या बाजूने न राहता विरोधात प्रचार केला, तुला सोडणार नाही, अशी दमबाजी करून निघून गेला.त्यानंतर संबंधित टोळके हॉटेल कॅनिव्हल येथे जाऊन धिंगाणा घालू लागले. यात त्यांनी हॉटेलचा सुरक्षारक्षक अमर बहादूर सिंग याला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली. दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच सदर गावठाण येथे असलेली वैभव विलास येळवंडे यांची मोटारीची ( एमएच १४ जीए १९७१) पाठीमागील काच कोयत्याने फोडली. तसेच सचिन येळवंडे यांची मोटार(एमएच १४ ईसी ५७३२) व मोटारकार (एमएच १४ ई यू ६८२५) फोडून निघून गेले. हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

टॅग्स :ChakanचाकणCrimeगुन्हाPoliceपोलिस