शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खलिस्तानवाद्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यास एटीएसचे पथक दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:59 IST

खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोन आरोपींच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. 

पुणे : खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोन आरोपींच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.       या प्रकरणात हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (रा. पंजाब) यास अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान, त्याचा साथीदार मोईन खान (रा. पंजाब) याचा गुन्हयात सहभाग आढळून आल्याने एटीएसचे पथकाने २४ डिसेंबर रोजी खान याला ताब्यात घेतले. मंगळवारी खान याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला एटीएसने अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांचे न्यायालयात हजर केले. दिल्ली येथे तपासासाठी एक पथक गेले असल्याने आरोपीचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली.          हरपालसिंग व मोईन खान हे सोशल मिडियाच्या माध्यमातून खलिस्तानवादी चळवळीत सक्रिय आहेत. वेगवेगळ्या  २० देशातील लोकांशीही ते संर्पकात असल्याचे आणि बनावट नावाने फेसबूक खाती असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहे. खलिस्तान निर्मितीसाठी तुरुंगातील आरोपी सोडविण्याची तयारी, हत्यारे गोळा करण्याची तयारी त्यांनी केल्याचे सोशल मीडिया आणि मोबाईलच्या विश्लेषणातून समोर आले आहे. आरोपींचा एक सक्रिय साथीदार गुरुजीत निज्जर (सायप्रस देश) हा एटीएसला निष्पन्न झाला असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले जात आहे. हरपालसिंग आणि मोईन खान यांचे सोशल मिडिया आणि मोबाइल डाटामधील माहितीचे विश्लेषण करण्यात येत असून त्याआधारे नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.  दोघांशी संबंधित असलेला दिल्ली येथील साथीदाराचा शोध घेण्याकरिता एटीएसचे एक पथक दिल्लीत गेले असून त्यांच्या हाती महत्वपूर्ण माहिती लागल्यास आरोपीची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयAnti Terrorist Squadएटीएस