शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रूथ अँड डेअर’च्या नावाखाली अत्याचार; रावेतमधील धक्कादायक घटना

By प्रकाश गायकर | Updated: January 24, 2025 16:43 IST

हॉस्टेलवर राहयला आलेल्या रीलस्टारमुळे घडला प्रकार 

पिंपरी : एका १७ वर्षीय मुलीवर २८ वर्षीय तरुणाने घरातील बाथरुममध्ये अत्याचार केला असल्याचा प्रकार रावेत परिसरात उघडकीस आला आहे. पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते. मद्यप्राशन केल्यावर मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री ते पहाटे हा प्रकार घडला. आयुष आनंद भोईटे (२० रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्‍द्र ठाकूर (२२ रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (२५, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोईटे याने सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय पीडित मूळची राजगुरुनगर येथील असून ती नीट (एनईईटी) परीक्षेची तयारी करण्यासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात भाडेतत्त्वावर राहते. पाच वर्षांपूर्वी तिची पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका रीलस्टार मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. रीलस्टार मुलीचे आईशी पटत नसल्याने ती पीडित मुलीच्या हॉस्टेलवर एक दिवस राहण्यासाठी आली. विशेष म्हणजे या दोघी मागील पाच वर्षांत कधीच एकमेकींना भेटलेल्या नव्हत्या. रीलस्टार मुलगी पीडित मुलीच्या हॉस्टेलवर आल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करून मी संत तुकारामनगर येथे आली आहे दुसऱ्या दिवशी माझे शूटिंग उरकले की मी घरी येईन, असे सांगितले होते. याच दरम्यान इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच संशयित आरोपी भोईटे याच्याबरोबर काही वर्षांपूर्वी रीलस्टार मुलीची ओळख झाली होती. पीडित मुलीला मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून संबंधित रीलस्टार रावेत येथे गेली. तेव्हा भोईटे आणि संबंधित रीलस्टारने मद्यप्राशन केले. मध्यरात्रीपर्यंत ही मैत्रीण परत न आल्याने पीडितेने तिला फोन करून हॉस्टेलवर कधी येणार याची विचारणा केली. मात्र, तूच पार्टीसाठी इकडे ये असे तिला सांगितले. त्यानंतर पीडितेने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन सुशील आणि रितिक या दोघांनी पीडितेला कारमध्ये बसवून रावेत येथे आणले. रावेत येथे आल्यानंतर पीडित, रीलस्टार आणि आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले. सर्वांनी मद्य प्राशन केल्यानंतर ‘ट्रूथ अँड डेअर’ खेळायला सुरुवात केली. त्यातच आरोपीने पीडितेशी जवळीक साधत अत्याचार केला.  चुकून फोन लागल्याने प्रकार उघड आरोपी भोईटे याने प्रथम रीलस्टारबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात नेत तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला. फोन सुरू असल्याचे पीडितेला आणि आरोपीला लक्षात आले नाही. संबंधित नातेवाईकाने हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळवला. नातेवाईकाने धक्कादायक माहिती सांगितल्यावर पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरी-चिंचवडमध्ये धाव घेतली.  ‘ट्रूथ अँड डेअर’ने आयुष्यभराची सजाट्रूथ अँड डेअर’ या खेळामध्ये जसा समोरचा सांगेल तसे करायचे असते. यामध्ये पिडीतेच्या मैत्रिणीला दोन मित्रांनी चुंबन घ्यायला सांगितले. असे बराच वेळ झाल्यानंतर आरोपींनी तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी भोईटे याने पीडितेला बाथरुममध्ये नेत अत्याचार केला. 

पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर सर्व आरोपींची नावे निष्पन्न केली. त्याचबरोबर संबंधित रीलस्टार मुलीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. या सर्व प्रकारानंतर रात्री उशिरा तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये रावेत पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  - नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस