शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

वाहनांना सोडण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 8:13 PM

लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर संशय आल्याने रोकड टेबलावर फेकून पुण्याच्या दिशेने निघून पळून गेले होते.

ठळक मुद्देउर्से टोलनाका परिसरात बुधवारी (दि. 29) रात्री घडली ही घटना

पुणे : द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या दोन वाहनांना सोडण्यासाठी तडजोडी अंती १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास न्यायालयाने 3 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली. सत्यजित रामचंंद्र अधटराव असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र रामजित यादव (वय ४१) या व्यक्तीने लाचलुचपत विभाकडे तक्रार दिली होती.उर्से टोलनाका परिसरात बुधवारी (दि. 29) रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. यादव हे त्यांच्या गाडीतून पवनचक्कीचे पाते घेऊन चेन्नईहून राजकोटकडे जात असताना अधटराव यांनी यादव व त्यांचे सहकारी यांची दोन वाहने टोलनाक्यावर अडवून ठेवली. ही दोन्ही वाहने लॉकडाऊन झाल्यानंतर (३ मे)सोडू असे अधटराव याने यादव यांना सांगितले. दोन्ही गाड्या लगेच सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार असे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, याबाबत यादव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.अधटराव याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत संभाषणातून स्पष्ट झाले आहे. तसेच, लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्याला संशय आल्याने लाचेची रोकड टेबलावर फेकून चारचाकीतून पुण्याच्या दिशेने निघून गेले होते. याप्रकरणी त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात महामार्ग सुरक्षा पथकाचे इतर अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे का या दृष्टीने तपास करायचा आहे. तसेच, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांच्या न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCorruptionभ्रष्टाचार