मुख्यमंत्री साहाय्यता निधीस नसरापूर व्यापाऱ्यांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:14 IST2021-08-13T04:14:18+5:302021-08-13T04:14:18+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास नसरापूर येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन सहायता निधीस खारीचा वाटा समजून फूल ना ...

Assistance of Nasrapur traders to CM Assistance Fund | मुख्यमंत्री साहाय्यता निधीस नसरापूर व्यापाऱ्यांची मदत

मुख्यमंत्री साहाय्यता निधीस नसरापूर व्यापाऱ्यांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास नसरापूर येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन सहायता निधीस खारीचा वाटा समजून फूल ना फुलाची समजून मदत नसरापूरचे मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यांच्याकडे साडे १५ हजाराचा धनादेश सुपूर्द केला. त्याचबरोबर अग्निहोत्र सेवा मंडळाच्यावतीने चिपळूण पूरग्रस्त यांना नसरापूर ग्राहक पंचायतीकडे धनादेश देण्यात आला. यावेळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, भगीरथ घुले, गाव कामगार तलाठी जालिंदर बरकडे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापिका रुपमकुमारी, नसरापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गयावळ, नंदू राजे, नवनाथ महाराज, मेडीकल असोसिएशनचे राहुल देशपांडे, रमेश कदम, अग्निहोत्र सेवा मंडळाचे दत्तात्रय वाल्हेकर, विजय जंगम, प्रविण शेटे, संतोष मांढरे, सुरेश गोरे आदी उपस्थित होते.

१२ नसरापूर

मदतीचा धनादेश श्रीनिवास कंडेपल्ली यांच्याकडे देताना व्यापारी.

Web Title: Assistance of Nasrapur traders to CM Assistance Fund